Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाहन चोरी गेल्याल्यानंतर विमा कंपनीने क्लेम नाकारला तर प्रत्येकाला माहिती हवी


 



वाहन चोरी गेल्याल्यानंतर विमा कंपनीने क्लेम नाकारला तर प्रत्येकाला माहिती हवी 








● सर्वप्रथम FIR नोंद करा 

● क्लोजर रिपोर्ट नंतरची प्रक्रिया

● सेटलमेंट कसे होते? 

● कायदेशीर मार्ग कायदेशीर मार्ग काय आहे?



तुमच्या गाडीचा कार किंवा दुचाकीचा विमा काढणे अनिवार्य आहे. कारण वाहनाचा अपघात झाल्यावरच तुम्हाला विम्याचा दावा मिळत नाही. तर तुमचे वाहन चोरीला गेल्यावरही त्याचा लाभ मिळतो. मात्र वाहन चोरीचा दावा करताना बहुतांश लोक द्विधा मनस्थितीत असतात.  या वस्तुस्थिती मागे योग्य कागदपत्रा याशिवाय संपूर्ण प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे असे प्रकार घडताना दिसतात. परिणामी विमा असूनही लोकांना त्याचा फायदा होत नाही. आज आपण या गोष्टी सोप्या करून सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाहनावर सहज क्लेम मिळेल.

 


सर्वप्रथम FIR नोंद करा 


तुमची गाडी किंवा मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट करायची म्हणजे पोलिसांकडे एफ आय आर नोंदवणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याच्या आधी तक्रार करावी. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कळवावे की तुमच्या मालकीचे वाहन पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेले आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस लगेच गुन्हा नोंद करत नाही.तर प्रथम तपास करतात. तपासांती त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरीला गेलेले त्यांना आढळले तर त्यानंतर पोलीस फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ नुसार गुन्हा नोंद करतात . हा एफआयआर संपूर्ण पुढील प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. हा रिपोर्ट नोंदल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करून वाहन चोराला पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र जेव्हा असा वाहन चोर सापडत नाही, तेव्हा पोलीस त्या प्रकरणात आपला नॉन स्ट्रीसेबल रिपोर्ट सादर करतात. ज्याला क्लोजर रिपोर्ट असे म्हणतात.



पंतप्रधान मुद्रा कर्ज कसे मिळेल ? येथे क्लिक करून वाचा  



क्लोजर रिपोर्ट नंतरची प्रक्रिया 


जेव्हा वाहन मालकाला न्यायालयात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट आणि न्यायालयाचा आदेश प्राप्त होतो. तेव्हा अशा वाहन मालकाने या कागदपत्रांचे विमा कंपनीकडे जाण्याचे वेळ येते एका साध्या अर्जाद्वारे विमा कंपनीला याची माहिती द्यावी लागते. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून तपासात ते चोरीचे वाहन पोलिसांना सापडले नाही. या परिस्थितीत वाहन मालक विमा कंपनीकडून त्याच्या चोरीला गेल्याल्या  वाहनाच्या संदर्भात द्यावयाची रक्कम रक्कम प्राप्त करण्यास पात्र असतो.



सेटलमेंट कसे होते?


योग्यरीत्या भरलेला क्लेम फॉर्म, ड्रायव्हिंग लायसन, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, पॉलिसी दस्तऐवज, एफआयआरची एक प्रत आणि तुमच्या शहराच्या आरटीओला सुरवातीची माहिती देणारे पत्र विमा कंपनीला द्यावे लागेल. त्यानंतर जेव्हा पोलीस त्याचा तपास पूर्ण करतात आणि नंतरवाहन सापडत नाही असा अहवाल  सादर करतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या वाहनाची आरसी बुक आणि वाहनाच्या चाव्या विमा कंपनीकडे द्यावे लागतील. त्यानंतर सर्वेक्षणाच्या अहवालावर आधारित विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. साधारणपणे अशा परिस्थितीत पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर विमा कंपनी दाव्याची रक्कम वाहन मालकाला देतात. मात्र जर अशी रक्कम विमा कंपनीने इतर कोणत्याही कारणास्तव दिली नाही. तर वाहन मालकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. वाहनाचा विमा उतरवला असूनही कंपनीतून दावा फेटाळला जात असल्याचे तुम्ही न्यायालयात सांगू शकत आहे. 



तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले आहे ते येथे क्लिक करून पहा




कायदेशीर मार्ग कायदेशीर मार्ग काय आहे?


 विमा कंपन्याने वाहनाचा मालक यांच्यातील सेवा देणारा आणि ग्राहक असा असतो. त्यामुळे या प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा विषय २०१९ लागू होतो आहे. पोलिसांकडून प्लीज क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला असेल यामध्ये वाहन शोधूनही सापडत नाही.असे वाहन जर असेल आणि तसं पोलिसांनी कळवले असेल. अशावेळी वाहन मालक त्याबद्दल ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतो. 


अपघात नुकसानिशी संबंधित प्रकरणे मोटर वाहन अपघात दाव्यांच्या न्यायालयात जातात. ही सामान्यत फक्त जिल्हा न्यायालयात चालवली जातात. मात्र फर्स्ट पार्टी विम्याचे प्रकरणे ग्राहक न्यायालया समोर जातात. ग्राहक मंचामध्ये कोणतेही प्रकरणे दाखल करण्यासाठी फार कमी खर्च म्हणजे न्यायालयीन शुल्क लागते. येथे पक्षकारांना लवकरात लवकर न्याय मिळतो.. ग्राहक मंचासमोर प्रकरण आल्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. सर्व अटी पूर्ण करूनही कंपनी विम्याचा दावा नाकारत असेल तर न्यायालय कंपनी क्लेम देण्याचा आदेश देऊ शकते. अशा प्रकारे वाहन चोरीच्या बाबतीत विमा कंपनीतून दावा मिळू शकतो. हा दावा केवळ चोरीसाठीच नाही तर वाहनाचे अपघातात नुकसान झाल्यासही मिळू शकतो..





Post a Comment

0 Comments

close